एलसीबीकडून सखोल तपास होणार ; पोलिसांची माहिती
कणकवली : काही दिवसांपूर्वी कणकवली शहरात एका हॉटेल समोरील ओव्हरब्रिज खाली गांजा खरेदी – विक्री चा प्रकार सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. याप्रकरणी निलेश ज्ञानदेव साटम (वय ४४ रा. जानवली गावठणवाडी ) व चेतन रामू जाधव (वय २० वर्षे, रा. कलमठ कुंभारवाडी ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मात्र काही दिवस पोलीस हे अवैध धंदे म्हणून अशा धंद्यावर कारवाई करत आहेत. मात्र वस्तुस्थिती पहिली तर पोलिसांना किंवा एलसीबी पथकाला अद्याप या गुन्ह्यांचं मूळ सापडलेल नाही.
मात्र या गुन्ह्याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी माहिती दिली की, असे अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलीस यंत्रणा सतर्क असून कोणाला काही अवैध धंदा आढळून आला तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच एलसीबीकडे गांजा सप्लायर्स चा अता – पता काढण्यासाठी गुन्हा वर्ग केला आहे. त्याच्यामाध्यतून नेमका हा गांजा येतो कुठून ? यामागे नेमकं गूढ काय?यात कोणाचा हात आहे ? हे शोधून काढणार असल्याची माहिती श्री. यादव यांनी दिली.