चिपळूण -शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते.छोट्याछोट्या गोष्टीतून खूप काही शिकता येत.एखाद्या संधीचे सोनं करणं यासाठी जिद्द हवी . एखाद्या क्षेत्रात भरारी घ्यायची असेल तर त्याचं शिक्षण घेणं आवश्यक आहे.असे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ.दिशा दाभोळकर यांनी डीबीजे महाविद्यालयाच्या प्रमाणपत्र वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले.यावेळा पर्यवेक्षिका सौ.स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या.
येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी विविध प्रशिक्षण घेण्यात आली होती या प्रशिक्षित विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ.दिशा दशरथ दाभोळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष प्रमुख प्रा.दिशा दाभोळकर यांनी केले.महिला विकास कक्षातर्फे वर्षभरात विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले जेणेकरून विद्यार्थिनी स्वावलंबी होऊ शकतील असे मत व्यक्त केले . प्रमुख पाहुण्या सौ.दिशा दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले.आपलं अस्तित्व आपण निर्माण करावे.शिक्षणाला मर्यादा नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.तर पर्यवेक्षिका सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी स्री एकावेळी अनेक भूमिका पार पाडत असते.ती आदिशक्ती आहे.मानसिक व भावनिक संघर्ष करताना आपण डळमळून न जाता ठाम राहिले पाहिजे.असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला विकास कक्ष समिती प्रमुख प्रा.दिशा दाभोळकर,प्रा.मृण्मयी सोहोनी,प्रा.सौ सिद्धी साडविलकर,प्रा.सुचिता दामले, प्रा .सौ .अमिता कारंडे, यांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य प्रा.नामदेव तळप, रजिस्ट्रार श्री.अनिल कलकुटकी,प्रा.श्रीम.नम्रता माने,प्रा.सौ.अर्पिता पालशेतकर आदी उपस्थित होत्या.पाहुण्याचा परिचय प्रा.सौ.कांचन तटकरे, प्रमाणपत्र वाचन प्रा.सौ अमिता कारंडे केले, सूत्रसंचालन प्रा.सौ.एल.ए.बिरादार यांनी केले,तर आभार प्रा.सौ.प्राची राऊत यांनी मानले.