रत्नागिरीवासी दरवर्षी ज्या महोत्सवाची वाट पहातात तो सर्वांना आवडणारा लायन्स महोत्सव. सन 2000 पासून हा लायन्स महोत्सव लायन्स क्लब रत्नागिरी आयोजित करीत आहे. याचा मुख्य ऊद्देश म्हणजे लायन्स आय हॉस्पिटल. या हॉस्पिटल मार्फत दर महिन्याला साधारण 200-250 मोतीबिंदूंची ऑपरेशन केली जातात. त्यातील बहुतांश ऑपरेशन ही मोफत केली जातात. त्याकरीता निधी उभारण्यासाठी लायन्स क्लब महोत्सवाचे आयोजन करत असतो. मागील काही वर्षांच्या खंडानंतर आपण पुन्हा आपला लायन्स महोत्सव भव्य, दिव्य स्वरूपात सुरू करत आहोत. यामधे खरेदीसाठी विविध कंपन्यांचे स्टाॅल, खाण्याचे अनेक विविध स्वादिष्ट पदार्थ, कुटूंबासोबत आनंद घेण्यासाठी विविध करमणुकीचे कार्यक्रम, आनंद जत्रा , ऑटो एक्सपो ई गोष्टींचा समावेश केलेला आहे. सदर महोत्सव हा दि. १५ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत चंपक मैदान येथे सायं. ४:०० ते १०:०० मधे होणार आहे.
या महोत्सवात पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत
१५ जानेवारी : उद्घाटन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा
१६ जानेवारी : फॅशन शो
१७ जानेवारी : सोलो डान्स स्पर्धा
१८ जानेवारी : ग्रुप डान्स स्पर्धा
१९ जानेवारी : ब्युटी काॅन्टेस्ट
२० जानेवारी : व्हाॅईस ऑफ रत्नागिरी
२१ जानेवारी : होऊदे धिंगाणा
२२ जानेवारी : होम मिनिस्टर, समारोप
तरी सर्व रत्नागिरीमधील नागरिकांनी आपल्या परिवारासमवेत या महोत्सवामधे येऊन आनंद लुटावा असे आवाहन लायन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष ला. प्रविण जैन आणि संपूर्ण टीमने केले आहे.