शिष्यवृत्ती परीक्षेत बाबूराव जोशी गुरुकुलचे यश

 

रत्नागिरी : (कै.) बाबूराव जोशी गुरुकुलमधील आर्या जोशी हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन केले आहे. आर्याने जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा क्रमांक मिळवला. तिच्या यशाबद्दल गुरुकुल प्रमुख किरण जोशी, शिक्षक, जी.जी.पी.एस. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मुरकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिला मार्गदर्शन करणारे पालक व सर्व शिक्षक यांचेही विशेष कौतुक केले आहे.