सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे जीवनविद्या मिशन यांचा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये जिवनविद्या मिशन यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जिवनविद्या मिशनचे श्री. दशरथ शिरसाट, श्री. क्रुष्णा भास्कर, श्री. संदीप परब, श्री. सागर महाडीक हे ऊपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता करता जीवन कस सम्रुद्ध कराव याबाबत श्री. दशरथ शिरसाट यांनी सुंदर मार्गदर्शन केले. संगणक विभागाच्या विभागप्रमुख सौ. सुप्रिया नलावडे यांनी सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. निलमताई राणे, ऊपाध्यक्ष मा. निलेशजी राणे, सचिव मा. नितेशजी राणे,.प्राचार्य डाँ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी जिवनविद्या मिशन यांचे आभार व्यक्त केले.