तब्बल २७ वर्षानंतर नंतर विद्यार्थी आले एकत्र
जुन्या आठवणींना दिला उजाळा
लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील शिपोशी येथील न्या. वै.वि.आठल्ये विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेजच्या
१९९४-९५ बॅचच्या अकरावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर अर्थात स्नेह मेळावा नुकताच ऍग्रो टुरिझम तोणदे रत्नागिरी येथे पार पडला. तब्बल २७ वर्षांनी एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांची २७ वर्षांनंतरची ही पुनर्भेट अविस्मरणीय अशी ठरली. या बॅचचे सर्व विद्यार्थी ज्यांना दादा म्हणून संबोधतात असे विद्यार्थ्यांचे दादा संतोष कृष्णा कांबळे हे देखील आवर्जून उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी भविष्यात एकमेकांना सहकार्य करावे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हावे आणि काही सामाजिक उपक्रम राबवावेत यासाठी वचनबद्ध झाले. यापुढेही पुन्हा एकत्र यावे असा मानस व्यक्त करून अत्यंत जड अंतःकरणाने सर्वांनी निरोप घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यात सहभागी असलेल्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे दादा संतोष कांबळे, प्रकाश जोईल, प्रभाकर वरेकर, महेंद्र सावंत, प्रदीप खांडेकर, प्रकाश सुकम, मनीषा पवार, सुषमा बने, संतोष खांदारे, महेश पानकर, जितेंद्र गुरव, वैशाली जाधव, नरेश आग्रे, सुजाता कदम, अजित खांदारे, कल्पना गवळी, अंजली जाधव, सुनील आठल्ये, प्रशांत तानीवडे, आणि किरण गुरव या सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग होता.या मेळाव्याचे विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी या ग्रुप ला एक कुटुंब मानतात.यामध्येही महत्वाची बाब म्हणजे लग्न होऊन सासरी गेलेल्या विद्यार्थिनींचा सहभाग लक्षवेधी ठरला.