रत्नागिरी : भंडारी श्री २०२३ ही शरीरसौष्ठव स्पर्धा रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या नियम व अटी नुसार घेण्यात येतील, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जीम मालक, ट्रेनेर यांनी आपल्या बॉडी बिल्डर्सना स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित करावे. स्पर्धकांसाठी प्रवेश विनामुल्य आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेची शान वाढवावी. पंचांचे निर्णय अंतिम रहातील व ते सर्वावर बंधनकारक राहतील, पंचांच्या निर्णया विरोधात कोणत्याही स्पर्धकाने आयोजकांच्या व नाट्यगृहातील वस्तूंची नासधूस केल्यास त्याची भरपाई संबंधीत स्पर्धक व त्यांचे जीम मालक व ट्रेनर यांचेवर राहील याची कृपया नोंद घ्यावी. यावर्षी पासून सर्व माजी भंडारी श्री टायटल विजेत्यांना स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्यात येत आहे.
भंडारी श्री टायटल विजेत्याला (समाज मर्यादित) रोख रु. ११,१११/- मानाचा पट्टा, मेडल, चषक व चांदीची गदा देण्यात येईल. खुल्या गटातील टायटल विजेत्याला रोख रु. ११,१११/-, मानाचा पट्टा, मेडल, चषक देण्यात येईल. उगवता तारा, बेस्ट पोझर (समाज मर्यादित व खुला गट) प्रत्येकी रोख रु. १०००/- मेडल व चषक. जिद्दी भंडारी समाज मर्यादित गट रु. १०००/- मेडल व चषक. दोन्ही ग्रुप मधील गटांमध्ये ६ नंबर काढण्यात येतील. प्रथम क्रमांकाला रु. १०००/- मेडल व चषक, द्वितीय क्रमांक रु.८००/- मेडल व चषक, तृतीय क्रमांक रु. ७००/- मेडल व चषक, चौथ्या क्रमांकाला रु. ६००/- व प्रमाणपत्र, पाचव्या क्रमांका रु.५०० व प्रमाणपत्र आणि सहाव्या क्रमांकाला रु. ३००/- व प्रमाणपत्र. तरी दरवर्षी प्रमाणे सर्व स्पर्धक, त्यांचे ट्रेनर्स व जीम मालक यांनी आपल्या बॉडीबिल्डर्सना स्पर्धेत भाग आवाहन करण्यात आले आहे.