अध्यक्षपदी नारूरचे केशव उर्फ दीपक नारकर तर उपाध्यक्षपदी कुडाळचे अरविंद शिरसाट
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी नारूरचे माजी सरपंच पंचायत समितीचे माजी सदस्य केशव उर्फ दीपक नारकर तर उपाध्यक्षपदी कुडाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरविंद शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर या प्रक्रियेतील अध्यक्ष उपाध्यक्ष ही महत्त्वाची निवड आज शनिवार १४ जानेवारी रोजी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात संपन्न झाली. सर्व राजकीय पक्षांचे संचालक या ठिकाणी असताना अध्यक्ष व उपाध्यक्ष ही निवडणूक बिनविरोध करून कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाने नवा पायंडा पाडला आहे. या निवडीमध्ये अध्यक्षपदी नारू येथील केशव उर्फ दीपक नारकर तर उपाध्यक्षपदी कुडाळचे अरविंद शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक विलास सोनाप्पा बुटाले (घोटगे), किशोर सखाराम मर्गज (पांग्रड), विजय सुरेश प्रभू (तेंडोली), भास्कर बाळा परब (तेर्सेबांबर्डे), महादेव अनंत परब (कुडाळ), राजन रामचंद्र परब (कसाल), प्रसाद गजानन रेगे (कुडाळ), निलेश सदानंद तेंडुलकर (कुडाळ), वैशाली रावजी प्रभू (माणगाव), स्मिता जनार्दन तेरसे (निरुखे), मोहन वामन जाधव (गोवेरी), संजय धोंडदेव पडते (कुडाळ), तुकाराम भुंडलो भोई (माणगाव) हे उपस्थित होते. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यू. यू. यादव यांनी काम पाहिले आहे.
ही निवड झाल्यावर सर्व संचालकांनी खरेदी विक्री संघाच्या परिसरात असलेल्या सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, पप्या तवटे, बंड्या सावंत, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरपंचायतीचे भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब आदी उपस्थित होते.