सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाजाच्यावतीने श्रीम. उषा होडावडेकर यांना परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परीट समाजाच्यावतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सालईवाडा सावंतवाडी येथील त्यांच्या राहत्या घराचे खूप मोठे नुकसान झाले. याची दखल घेत परिट समाज बांधव एकत्र येऊन त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, मा. नगरसेविका दिपाली भालेकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर, सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर, तालुका उपाध्यक्ष स्वप्नील कदम, शहराध्यक्ष दयानंद रेडकर, किरण वाडकर, सुरेश पन्हाळकर, सुनील वाडकर, श्री आरोलकर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.