Jio World Plaza : मुंबईत सुरू झाले जिओ वर्ल्ड प्लाझा, टॉप ब्रँड्स आणि बरंच काही…

मुंबई: रिलायन्स रिटेलने मंगळवारी मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्धाटनाची घोषणा केली आहे. येथे टॉप अँड रिटेल फॅशन आणि एंटरटेनमेंट एक्सपिरियन्सचा अनुभव मिळू शकतो. मुंबईच्या बीकेसी स्थित या प्लाझाचे दरवाजे सामान्य माणसांसाठी १ नोव्हेंबरपासून खुले होणार आहे. हा प्लाझा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, द डिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डनशी संबंधित आहे.

लाँचबाबत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची डायरेक्टर इशा अंबानीने सांगितले की जिओ वर्ल्ड प्लाझाचा हेतू जगातील बेस्ट ब्रँड्सना भारतात आणण्यासोबतच भारताच्या टॉप ब्रँड्सचे कौशल्य आणि कारगिरी सर्वांपर्यंत पोहोचवणे आहे. यामुळे रिटेलचा अनोखा अनुभव भेटेल. सोबतच चांगला ग्राहक अनुभव, उत्कृष्टता आणि नाविन्याप्रती आमची मेहनत प्रत्येक उद्योगात आम्हाला पुढे जाण्यास मदत करणार.

प्लाझाबाबत अधिक माहिती

प्लाझाला रिटेल, आराम आणि खाण्यापिण्याच्या एक्सक्लुझिव्ह हबच्या रूपात डिझाईन करण्यात आले आहे. ७,५०,००० स्क्वे फूट आणि चार मजल्यांवर पसरलेल्या या सेंटरमध्ये ६६ लक्झरी ब्रँड्स एका छताच्या खाली येणार आहेत. यात काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही असणार आहे ज्यांची भारतात एंट्री झाली आहे. यात बॅलेंसियागा, जॉर्जिया अरमानी कॅफे, पॉट्री बार्न किड्स, सॅमसंग एक्सपिरियन्स सेंटर, EL&N कॅफे आणि रिमोवाचा समावेश आहे.