चिपळूण काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात इंदिरा गांधी, सरदर पटेल यांना अभिवादन

चिपळूण (प्रतिनिधी) : भारताच्या पहिल्या माजी पंतप्रधान, आयर्न लेडी स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त तसेच भारताचे पहिले उपपंतप्रधान, लोहपुरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त आज चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष तथा चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा चिटणीस कैसर देसाई, सेवादलचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, सचिव पूर्वा आयरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज दळी, सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष रुपेश आवले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष देसाई, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते, काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या रवीना गुजर, संभाजी ब्रिगेडचे मकरंद जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते अ. ल. माळी, एस. आर. पाटील, संजय साळवी, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते. यावेळी प्रशांत यादव यांच्यासह सुरेश राऊत, टी. डी. पवार, निर्मला जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. लियाकत शाह यांनी आभार मानले.