खेड | प्रतिनिधी : खेड शहरातील बज्म-ए- इमदादीयाच्या एम. आय.बी गर्ल्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमार्फत राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक प्रज्ञा सावंत यांनी पटकावला. त्यांना रोख रक्कम रुपये ५ हजार देऊन गौरवण्यात आले.
द्वितीय क्रमांक शहजाद परकार रुपये ३००० आणि तृतीय क्रमांक फेरोज खान रुपये २००० तसेच उत्तेजनार्थ किशोर वालावलकर व अनिल सुतार यांना प्रत्येकी रुपये १००० चे पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी ‘इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे अन्य भाषिक शाळांवर होणारे परिणाम व त्यावरील उपाययोजना’ असा विषय ठेवण्यात आला होता. त्याचा निकाल २६ रोजी ए.ई. कालसेकर कॅम्पस खेड येथे सकाळी ठीक १०वाजता संस्थाध्यक्ष ए. आर. डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आला. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मिश्रा, श्री. म्हस्के व सुरैया खतीब मँडम उपस्थित होत्या. या उत्तम निबंधांचे वाचनही करण्यात आले तसेच यशस्वितांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. श्री. मिश्रा व श्री. म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले.










