पन्नासाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची तुळशी येथे सांगता.

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : पंचायत समिती शिक्षण विभाग, मंडणगड यांच्या माध्यमातून न्यु इंग्लिश स्कूल, तुळशी येथे 50 साव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे 12 व 13 जानेवारी 2023 या दोन दिवसांचे कालावधीत आयोजन करण्यात आले होते. तंत्रज्ञान व खेळणी या विषयास समर्पित विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस व प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी भुषविले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. शिंदे, यांच्यासह मंडणगड तालुक्यातील माध्यमीक विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, माध्यमीक शाळांतील मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, विज्ञानप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनात आयोजीत विविध स्पर्धाचे पारितोषीकाचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. प्राथमीक विभाग विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत राजीव गांधी इंग्लिश मिडीयम स्कुल, मंडणगडच्या पियुष भुवड याने प्रथम, के.व्ही. भाटे विद्यामंदीर वेसवीचे जीवन नाचरे याने व्दितीय तर हुतात्मा तुकाराम बबन भोईटे विद्यालय कुंबळेच्या तनेश निकम याने तृतीय क्रमांक मिळवीला. माध्यमिक शिक्षक शैक्षणीक साधने निर्मीती स्पर्घेत प्रा. प्रभाकर भालके याने प्रथम, रविंद्र बांगर यांनी व्दितीय तर शिवाजी सोनवणे यांनी तृतीय क्रमांक मिळवीला.

प्राथमीक शिक्षक शैक्षणीक साधने निर्मीती स्पर्धेत आनंद सुतार यांनी प्रथम, रसिका रेवाळे यांनी व्दितीय, संजय घागरुन यांनी तृतीय क्रमांक मिळवीला. प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोग साहित्य निर्मीती स्पर्धेत किरण बेलोसे यांनी प्रथम, संदेश पारधी यांनी व्दितीय क्रमांक मिळवीला. इयत्ती आठवी ते नववी विद्यार्थ्यांच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत इंग्लिश मिडीय स्कुल मंडणगडच्या निलम मेहता व आयुष कांबळे यांनी प्रथम, पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कुलच्या आश्विनी नगरकर, सनी चिंचघरकर यांनी व्दितीय, डॉ. बी.ए. हायस्कुल मंडणगडच्या शैलश शिरगिरे व ओंकार गोरड यांनी तृतिय क्रमांक मिळवीला. माध्यमीक विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत महाराष्ट्र उर्दू हायस्कुल म्हाप्रळ च्या तहुरा म्हालणकर हीने प्रथम, केंद्रशाळा म्हाप्रळ नं 1 च्या किर्ती डोंगरे हीने व्दितीय, जि.प. शाळा बहिरीकोंड च्या वंशिका काप हीने तृतीय क्रमांक मिळवीला. विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील सर्व शाळांचा उत्सर्फुत प्रतिसाद लाभला, बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शांताराम पवार यांनी केले.