शिरशिंगे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांची भेट विकास कामांची केली पाहणी

दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील नवशी शिरशिंगे या ग्रामपंचायतीला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांनी अचानकपणे भेट देऊन नवशी शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली आणि पूर्ण झालेल्या विकासकामांची पाहणी केली. विकासकामांच्या गुणवत्तेचा दर्जा तसेच पूर्ण झालेल्या विविध विकासकामांच्या पूर्ततेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांनी दापोली तालुक्यातील नवशी शिरशिंगे या ग्रामपंचायतीला भेट दिली त्यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश देऊ मांडवकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांचे ग्रामपंचायत कार्यालयात स्वागत केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, जल जीवन मिशन योजनेतर्गंत कामांची पाहणी केली, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सार्वजनिक शौचालय, रमाई आवास घरकुल आदी विकास कामे तसेच वैयक्तिक लाभांच्या योजनांची माहिती घेत त्यांची पाहणी केली.

नवशी शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या पाहणीदरम्यान ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांची किर्तीकिरण पूजार यांनी पाहणी केली सरपंच सुरेश देऊ मांडवकर यांच्याशी संवाद साधत पूर्ण झालेल्या कामांसह सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी सरपंच मांडवकर यांनी संपूर्ण माहिती दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी समाधान केले. यावेळी सरपंच मांडवकर यांच्या कामाचे कौतुक करत ग्रामस्थांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळे येथे होत असलेली विकासकामे उत्तम दर्जाची होत असल्याचे समाधान व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान   उपसरपंच विशाल जाधव, ग्रामसेविका अमृता आर्ते,     मिलिंद गोरीवले, गौरी चोरगे, अंकिता मांडवकर, ऊर्वशी आयरे, ग्राम रोजगार सेवक विजय मेहता, अजित जाधव, नितिन जाधव, शरद मेहता, दिपाली चोरगे आदी ग्रामस्थही उपस्थित होते.