सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत अडुळकर यांचे निधन

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत बाबू अडुळकर (50) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वायंबोशी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिला हवालदार माधुरी अडुळकर यांचे ते पती होत. अडुळकर यांनी सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे सेवा बजावली होती. गेली चार वर्षे ते वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आपल्या पोलीस सेवेत त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला होता. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार ही मोठा होता. पोलीस खात्यात त्यांना मेजर म्हणून संबोधले जात होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, भावजयी असा परिवार आहे.