चिंदर गावच्या विकासाठी प्रयत्नशील राहणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चिंदर येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन संपन्न

आचरा l अर्जुन बापर्डेकर : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने प्रशासकीय मंजूरी असलेल्या चिंदर सडेवाडी ते माऊली मंदिर ग्रा.मा. 59, चिंदर भगवंतगड रस्ता, तेरई भगवंत गड रस्ता व भटवाडी येथे मंजूर बी, एस्, एन, एल् टाँवर अशा विविध कामांचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी चिंदर माऊलीमंदिर येथे पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री यांनी चिंदर गावाशी आपले जवळचे संबध आहेत व या गावातील राहिलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी चिंदर देवस्थानच्यावतीने अनिल घाडी, अरविंद घाडी, मधुकर पाताडे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना माऊलीची प्रतिमा देवून तसेच अल्पसंख्यांक भाजप जिल्हाध्यक्ष व ख्रिश्चन समाज .भाजप पदाधिकारी संतोष कोदे व मंगेश गांवकर यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, राजु राऊळ, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, विरेश पवार, राजन गांवकर, राजन पांगे, संतोष गांवकर, नारायण पाताडे, सचिन हडकर, चिंदर सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वे, महेंद्र मांजरेकर, शशीकांत नाटेकर, सानिका चिंदरकर, प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, मनोज हडकर, रवि घागरे, अरविंद घाडी, अनिल घाडी, भाई अपराज, हिमाली अमरे, दक्षता सुर्वे, स्वाती सुर्वे, भाई तावडे, प्रिया पालकर, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, राजु त्रिंबककर, सुनिल, पळसंब सरपंच महेश वरक, चंदू सावंत, सुमित सावंत, प्रफुल्ल प्रभू तसेच चिंदर व तालुक्यातील बहूसंख्य भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास अनुसरून ग्रामिण भागातील प्रत्येक व्यवस्था सुधारण्यासाठी गतिमान पद्धतीने काम करण्यासाठी आमच सरकार प्रयत्नशील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण विकासाच्या वेगळया दिशेने जाताना पाहत आहोत.सरकारी योजनांचा प्रत्येक घटकांला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. या भागातील विकास कामांसाठी माजी खासदार निलेश राणे आणि आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चिंदर गावातील विविध मान्यवरांनी पालकमंत्री चव्हाण यांचे स्वागत केले. आभार उपसरपंच दिपक सुर्वे यांनी मानले.