फोंडाघाट येथील मेडिटेशन वर्गास प्रचंड प्रतिसाद

Google search engine
Google search engine

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचा अभिनव उपक्रम

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी पुरस्कृत व हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टच्या मा. सौ. मानसी माजगावकर व मा. श्री. दीपक माजगावकर यांच्या प्रेरणेतून फोंडाघाट येथे मोफत मेडिटेशन वर्गाचे आयोजन फोंडाघाट महाविद्यालयात करण्यात आले होते. हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टचे कोल्हापूर येथील डॉ. गोपाळ व प्रा. अभिजीत खांडेकर यांनी मेडिटेशनबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकासह मेडिटेशन व रिलॅक्सेशन करून घेतले. यावेळी व्यासपीठावर फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री. संदेश सावंत, फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. शंकर सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. आनंद मर्ये व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा मेडिटेशन वर्ग संपन्न झाला. या मेडिटेशन वर्गाच्या यशस्वीतेसाठी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डाॅ. बालाजी सुरवसे, प्रा. संतोष आखाडे व जुनिअर कॉलेजचे प्रा. संतोष जाईल, संतोष पेडणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट, जुनियर कॉलेज फोंडाघाट व न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट मधील विद्यार्थी, पालक व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच फोंडाघाट परिसरातील ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने मेडिटेशन वर्गास उपस्थित होते.