प्रख्यात संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या सरपंचपदी मालगुंडचे विनायक राऊत,तर सचिवपदी गणपतीपुळेचे विद्याधर शेंड्ये यांची नियुक्ती

Google search engine
Google search engine

जाकादेवी | संतोष पवार : जगप्रसिध्द असलेले पर्यटन व धार्मिक स्थळ रत्नागिरी तालुक्यातील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे या देवस्थानच्या सरपंचपदी मालगुंड येथील विनायक तुकाराम राऊत यांची निवड झाल्याने तसेच मालगुंड शाळेचे माजी विद्यार्थी विद्याधर शेंड्ये यांची देवस्थानच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल या दोन्ही पदाधिकारी यांचा मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते मालगुंड येथे शुभेच्छापर सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी संचालक उपस्थित होते. यामध्ये संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर ,संस्थेचे सचिव व सत्कारमूर्ती विनायक राऊत,संस्थेचे संचालक किशोर पाटील, गजानन उर्फ आबा पाटील,श्रीकांत मेहेंदळे, परेश हळदणकर, रोहित मयेकर ,शंकर आंबेकर , नंदकुमार यादव, प्राधा. कोल्हापूर येथील उमेश अपराध ,विलास राणे, मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, मुख्याध्यापक बिपीन परकर, मुख्याध्यापक आशिष घाग, प्राचार्य स्नेहा पालये,नितीन मोरे ,विक्रांत राऊत , यांसह अनेक मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालगुंड प्रशालेचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे यांनी केले‌. यावेळी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथील नव्याने सरपंच म्हणून नियुक्त झालेले मालगुंड शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत यांचा तसेच विद्याधर शेंड्ये यांचा मालगुंड शिक्षण संस्थेच्या बळीराम परकर विद्यालय,मुरारी तथाभाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड, जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी, डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली,मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालय चाफे ,या शैक्षणिक शाखांच्यावतीने देवस्थानचे नूतन सरपंच विनायक राऊत ,नूतन सचिव विद्याधर शेंड्ये यांचा शाल,श्रीफळ ,बुके देऊन येथोचित सत्कार करण्यात आला .

सत्कार समारंभात शिक्षक व मान्यवर यांनी सदैव कार्यतत्पर असलेले, अभ्यासू व्यक्तिमत्व श्री. विनायक राऊत, श्री. विद्याधर शेंड्ये यांच्या कारकिर्दीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय विचारातून बंधू मयेकर यांनी विनायक राऊत व विद्याधर शेंड्ये यांची जिद्द,धाडस ,अभ्यास,निष्ठा आणि आणि कर्तव्यतत्परचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही सत्कारमूर्ती यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षण संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक नामदेव वाघमारे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक नितीन मोरे यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अमित जाधव यांनी केले.