टक्के प्रतिष्ठानचे सामाजिक व शैक्षणिक कार्य आदर्शवत – डॉ. नामदेव गवळी

Google search engine
Google search engine

वैभववाडी रिदम प्ले स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात

वैभववाडी | प्रतिनिधी : स्वर्गीय टक्के गुरुजी प्रतिष्ठान संचलित रिदम प्ले स्कूल वैभववाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन सुवर्णा मंगल कार्यलयात मोठ्या उत्साहात पार पडले. ३ ते ६ वयोगटातील बालकांचे नृत्याविष्कारांनी उपस्थितांना मोहित केले. नृत्य-नाट्य, स्किटचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. तसेच लहानगट व मोठागट अशी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. लहान गटामध्ये कुमार मिथान गुरखे- प्रथम क्रमांक, दक्षा महाजन – द्वितीय क्रमांक, धैर्य रावराणे -तृतीय क्रमांक, हर्ष मुरकर- चतुर्थ क्रमांक आणि राधा कडू- पाचवा क्रमांक आला व मोठ्या गटांमध्ये धैर्य बोडेकर- प्रथम क्रमांक, स्वामिनी पाटील- द्वितीय क्रमांक, अनन्य महाजन- तृतीय क्रमांक, शुभ्रा सावंत- चतुर्थ क्रमांक, वक्रतुंड सुतार याचा पाचवा क्रमांक आला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंगेश कदम, विद्याधर सावंत, व गंगाधर केळकर यांनी काम पाहिले. आदर्श विध्यार्थी व आदर्श विध्यर्थिनींचा म्हणून कु. धैर्य बावडेकर व कु दुर्वा महाडिक यांचा गौरव करण्यात आला. प्ले स्कूलच्या संचालिका सौ सलोनी संतोष टक्के यांनी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यांच्या सहकारी कु. प्राची सुतार, सौ. रेश्मा गुरव यांचेही कौतुक करण्यात आले.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रोफेसर डॉ. नामदेव गवळी, सिंधू वसुंधराचे संचालक श्री. राजेंद्र काडगे , व्यावसायिक ढेकणे , बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर तेलंग सर, माजी सभापती स्नेहलता चोरगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सेंचुरी रेयॉन कंपनीचे ऑफिसर भास्कर मांजरेकर, औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर , सामाजिक कार्यकर्ते बाबा कोकाटे, सुधीर नकाशे, उद्योजक केळकर यांच्या हस्ते विविध स्पर्धांची बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भास्कर मांजरेकर, उद्योगपती मनोहर नारकर ,प्राध्यापक जनार्दन नारकर व श्री राजेंद्र काडगे यांचा स्व टक्के गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश पाटील, संकेत रावराणे, समीर रावराणे, प्राध्यापक चौगुले सर, प्राध्यापक पाखरे सर, प्राध्यापक शिंदे सर, नितीन महाडिक, प्रताप माने, संतोष दळवी, ज्ञानेश्वर सुतार, वामन सुतार, दीपेश माकुते, राकेश कुमार सावंत, बाळू शिरावडेकर आदी मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाची साउंड व विद्युत व्यवस्था श्री सचिन सुतार यांनी उत्कृष्ठरित्या केली. स्कुलच्या विकासासाठी सहकार्य करणाऱ्या व प्रतिष्ठानच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व हितचिंतकांचे व स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार प्रतिष्ठानचे अधक्ष श्री संतोष श्रीधर टक्के यांनी मानले.