हिर्लेवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

आचरा  | अर्जुन बापर्डेकर : माघी गणेश जयंती उत्सव मंडळ हिर्लेवाडी तर्फे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त बुधवार २५ जानेवारी रोजी सकाळी गणेश जयंती उत्सव सोहळ्यास प्रारंभ दुपारी महाप्रसाद रात्री आठ वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ हिर्लेवाडी यांचे सुश्राव्य भजन. रात्री दहा वाजता स्थानिक कलाकारांचे रेकॉर्ड डान्स व एकांकिका कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक २६जानेवारी रोजी रात्री आठ वाजता श्री ब्राह्मण देव महिला प्रसादिक भजन मंडळ हिर्लेवाडी चे भजन रात्री दहा वाजता स्वराभिषेक आचरा आयोजितजिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा, शुक्रवार २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा ,रात्री आठ वाजता विनय वझेआणि मित्र मंडळ हिर्लेवाडी यांचे सुस्वार गायन, रात्री दहा वाजता पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा प्रमोद हर्याण विरुद्ध बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात होणार आहे .

शनिवार २८ जानेवारी रोजी दुपारी अडीज वाजता महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर,दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी सात वाजता वायंगणी येथील रवळनाथ मित्र मंडळाची आरती, सायंकाळी साडेसात वाजता ब्राह्मण देव प्रासादीक भजन मंडळ हिर्ले वाडीचे भजन रात्री आठ वाजता पंढरीनाथ प्रासादिक भजन मंडळाचे भजन रात्री साडेनऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रात्री साडेदहा वाजता मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ कुडाळ यांचा अकल्पासुर हा नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार २९जानेवारी रोजी सकाळी पूजा आरती दुपारी महाप्रसादानंतर सायंकाळी साडेचार वाजता श्रींच्या मूर्तीचे आचरा समुद्र किनारी विसर्जन होणार आहे तरी सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहन माघी गणेश जयंती उत्सव मंडळ हिर्लेवाडी तर्फे अध्यक्ष लवू मालंडकर आणि सहकारी यांनी केले आहे.