कणकवली पोलीस ठाणे येथे हवालदार पदी होत्या कार्यरत
कणकवली : पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या स्नेहा प्रकाश राणे यांची सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण (सीआयडी) या विभागात प्रतिनियुक्तीने निवड करण्यात आली आहे. 5 वर्षांकरिता ही नियुक्ती करण्यात आली असून, श्रीमती राणे या कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हवालदार या पदावर कार्यरत आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी तपास कामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्हा अन्वेषण विभाग कोकण भवन येथील पोलीस अधीक्षक यांनी ही नियुक्ती केली आहे. श्रीमती राणे यांचे या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.