ARM प्रो कबड्डीच्या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात नमो भालचंद्राय ठरला विजेता

Google search engine
Google search engine

महिला कबड्डी मध्ये हॉली क्रॉस सावंतवाडीने पटकावले प्रथम पारितोषिक

पहाटेपर्यंत चाललेले या कबड्डीसाठी कबड्डी प्रेमी होते मोठ्या संख्येने उपस्थित

कणकवली.(प्रतिनिधी)
ARM(अभय राणे मित्रमंडळ) प्रो कबड्डी मध्ये नमो भालचंद्रय संघाने आपले नाव कोरले असून महिला कबड्डी मध्ये होली क्रॉस सावंतवाडी विजेता ठरला आहे.पुरुष गटातील नमो भालचंद्राय व स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी यांच्यामध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेर नमो भालचंद्र हा विजेता ठरला व स्वयंभू रवळनाथ यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.सतत तीन दिवस आणि रात्र चाललेल्या या अभय राणे मित्र मंडळाच्या प्रो कबड्डी साठी कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

महिला कबड्डीच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरसेविका सुप्रिया नलावडे, नगरसेविका मेघा सावंत ,प्रतीक्षा सावंत,भाजप शहराध्यक्ष प्राची कर्पे, बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका समन्वय सुनील पारकर, अभय राणे,गणेश तळगावकर, भरत उबाळे ,महेश सावंत उपस्थित होते.बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मंडळाचे सर्वेसर्वा अभय राणे यांनी बोलताना सांगितले की सलग तीन वर्ष आपण या कबड्डी स्पर्धा भरवल्या आहेत. त्याला कबड्डीप्रेमींनी आम्हाला दिलेली साथ ही अतुलनीय आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी देखील आपण याहीपेक्षा मोठ्या स्पर्धा भरवणार असल्याची ग्वाही यावेळी अभय राणे यांनी दिली.

दरम्यान फायनल मध्ये झालेल्या महिला कबड्डी च्या सामन्या मध्ये होली क्रॉस सावंतवाडी यांनी जय गणेश मालवण त्यांच्यावर मात करत ARM चषक वर आपले नाव कोरले.तर पुरुष गटामध्ये सेमी फायनल स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी मित्र मंडळ आणि अनुभव लायन्स यांच्यामध्ये झाली यामध्ये स्वयंभू रवळनाथ मधली वाडीमित्र मंडळ विजयी होत त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला.दुसरा अंतिम फेरीचा सामना जय हनुमान मित्र मंडळ विरुद्ध नमो भालचंद्राय यांच्यात झाला त्यामध्ये नमो भालचंद्रय यांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.

अंतिम सामना नमो बालचंद्र व स्वयंभू रवळनाथ मधली वाडी मित्र मंडळ यांच्यात रंगला त्यामध्ये नमो भालचंद्र यांचे अष्टपैलू खेळाडू योगेश घाडीगावकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उत्कृष्ट पकड व राईड करत संघासाठी विजय खेचून आणला आणि संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम क्रमांक – नमो भालचंद्र
द्वितीय क्रमांक -: स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी मित्रमंडळ
तृतीय क्रमांक -: अनुभव स्पोर्ट
चतुर्थ क्रमांक -: जय हनुमान जाणवली
शिस्तबद्ध संघ – कोहिनुर स्पोर्ट्स
अष्टपैलू खेळाडू – योगेश घाडी
उत्कृष्ठ चढाई – परेश वालावलकर
उत्कृष्ट पकड – सिद्धेश भडसाळे
बोनस किंग – गिरीश चव्हाण
उगवता तारा – रुतीक चौगुले
यांना देण्यात आले.
या शेवटच्या सामन्याचे बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष अभय राणे यांच्या हस्ते पार पडले यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे ,उपाध्यक्ष सर्वेश राणे,खजिनदार औदुंबर राणे सचिव सागर राणे,सहसचिव सुधाकर उर्फ बंडू राणे, संदेश आरडेकर, ,रोहन राणे, यश पालव, प्रथम सावंत ,रुपेश साळुंखे, व्यंकटेश सावंत समीर सावंत, रोहन चव्हाण, शिवशंकर पारगावकर रुपेश वाळके ,निखिल बागवे, रोहन चव्हाण,आदर्श राणे, विजय राणे,तेजस राणे यांच्यासह अभय राणे प्रेमी उपस्थित होते. या कबड्डीसाठी स्पर्धेसाठी कबड्डी प्रेमी पहाटेपर्यंत मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित होते.