विजयाचा गुलाल भाजप-शिवसेना उमेदवारांचाच उडेल

माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास : सरपंच उमेदवार जेरॉन फर्नांडिस यांसह सर्व सदस्य उमेदवारांना दिल्या शुभेच्छा

आचरा | प्रतिनिधी : भाजपा – शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून राज्यात गतिमान विकास होत आहे. विकासाचे धोरण घेऊन आम्ही जनतेत जात असताना जनतेचा प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही विकासाचा अजेंडा घेऊन आमचे सर्व उमेदवार जनतेत जात आहेत. आचरे गावातही आम्ही विकास हाच अजेंडा ठेवत जनतेसमोर गेलो आहोत.
सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस यांचे स्वतःचे वेगळे वलय आहे. सरपंच उमेदवार तसेच सर्व सदस्य उमेदवारांना जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निवडणूक निकालात विजय भाजप शिवसेना युतीचाच असेल आणि गुलालही आमचाच उडेल. जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून येईल असा विश्वास भाजपा कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आचरा येथे व्यक्त केला.

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचे जेरोन फर्नांडीस व 13 सदस्य उमेदवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघर प्रचारावर भर देत झंझावाती प्रचार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आचरे गावात भेट देतली. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांशी चर्चा केली. निवडणुक प्रचाराचा आढावा घेत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस, महेश मांजरेकर, महेंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी संतोष कोदे, निवडणूक प्रमुख संतोष गावकर, राजन पांगे, बाबू परुळेकर, दीपक सुर्वे, मंदार सरजोशी, बाबू कदम, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, अतिक शेख, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, पूजा सरकारे, महिमा मयेकर, प्रमोद करलकर, सचिन हडकर, दत्ता वराडकर, यासह सदस्य पदाचे उमेदवार सारिका नंदकिशोर तांडेल, प्रियता पांडुरंग वायंगणकर, मुजफ्फर बशीर मुजावर, प्राजक्ता नामदेव देसाई, सायली सचिन सारंग, योगेश गोविंद गांवकर, श्रुती श्रीपाद सावंत, चंद्रकांत धोंडू कदम, हर्षदा उदय पुजारे, महेंद्र गोविंद घाडी, पंकज वामन आचरेकर, किशोरी किशोर आचरेकर, संतोष गणपत मिराशी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आचरा काझीवाडा येथे माजी खासदार निलेश राणे यांची काही मुस्लिम बांधवानी सदिच्छा भेट घेत चर्चा केली.

यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले, शिवसेना भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. याच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. पुढील पाच वर्षात काय करणार याचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहोत. त्यामुळे लोकांचा आमच्या उमेदवार यांवर विश्वास आहे. सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस यांचे स्वतःचे एक वेगळे वलय आहे. हे प्रचारदरम्यान सर्वत्र दिसून येत आहे. आमचे उमेदवार पदाधिकारी कसल्याच राजकारणात पडले नाही. जनतेच्या घेऊन जनतेचे आशीर्वाद घेत असताना प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निकालात विजय आमचाच होईल, गुलाल भाजप – शिवसेना युतीचाच उडणार असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.