अवैध दारू बाळगल्याप्रकरणी आंबोलीत एकावर कारवाई

आंबोली । प्रतिनिधी :
आंबोली चेकपोस्टच्या मागील रस्त्यावर अवैधरित्या बाळगलेली १७ हजार ७५० रूपयांची गोवा बनावटीची दारु चेक पोस्टवरील पोलिसांनी पकडली. यावेळी दारू बाळगल्या प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली. महेश स्वामीराम ढाले (रा.कुरनूर ता. अक्कलकोट,सातारा) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हा पोलीस चेकपोस्टच्या मागे संशयितरित्या आढळून आला. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही कारवाई रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.