कणकवली शहरातील गणपती साना येथील घटना ; कित्येक महिने केली जातेय सीसीटीव्हीची मागणी ; मात्र याकडे होते दुर्लक्ष
पोलीस निरीक्षक आता तरी घेणार का वृत्ताची दखल ?
कणकवली : शहरातील गणपती साना या याठिकाणी एक अनोखा प्रकार घडला असून एक आयुवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. तर त्या युवतीने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी सकाळी एका कॉलेज युवतीच्या प्रेमात असलेल्या युवकाने तिला फोन करून संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र त्या युवतीने आपल्याला ब्लॉक केले आहे हे लक्षात येताच त्याने तिला जाब विचारला. त्यानंतर गणपती साना परिसरात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती युवती खूप घाबरली होती यावेळी ती घाबरून जोरात किंचाळली. यावेळी त्या परिसरातील काही लोकांनी सदर युवकाला हे कृत्य करण्यापासून रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, त्या युवकाने पाण्यात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या हे प्रकरण कणकवली शहरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. पोलीस ठाण्यात याबाबत युवतीने धाव घेतली आहे.
एकंदरीत परिस्थिती जरी अशी असली तरी कणकवली शहरातील काही नामांकित विद्यालये तेवढीच जबाबदार आहेत. विद्यार्थी कॉलेज मध्ये न आल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालकांना याबाबत कल्पना न देणे, पालकांनी त्याची दखल न घेणे तसेच कॉलेज सुरू झालेपासून सुटेपर्यंत विद्यार्थ्यांना गेट बाहेर जाऊ न देणे, विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये मोबाईल फोन ला परवानगी न देणे, तसेक्सह किमान दिवसातून दोन वेळा विद्यार्थ्यांची अचानक धाड टाकून हजेरी नोंदवणे, असे जर दैनंदिन काम सुरू असती तर कॉलेज युवक युवतीची हिंमत झाली नसती.
मागील काही दिवस कणकवली गणपती साना याठिकाणी अशा प्रकारच्या घटना वाढत असताना सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे वृत्त अनेकदा प्रसारित करण्यात आले होते. मात्र याबाबत कोणीही दखल घेतलेली नाही. गणपती साना हे गार्डन नसून ते एक कणकवली च पर्यटन स्थळ आहे. मात्र या पर्यटन स्थळाला दृष्ट लागली असल्यासचे बोलले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणाचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र मागील काही दिवस गणपती साना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवून त्याचे नियंत्रण थेट पोलीस ठाण्यात करणे गरजेचे आहे. मात्र हे आता शासन प्रशासन व यंत्रणा करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.