हृदयरोगतज्ञ डॉ. निर्मला सावंत यांचा राजा शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे सत्कार

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अलीकडेच रुजू झालेल्या यांचा राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत यांनाही यावेळी मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले.

डॉ.निर्मला सावंत ह्या सावंतवाडी तालुक्यातील माजगांव गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मुंबई येथील जे. जे. शासकीय रुग्णालय येथे झाले. जे जे रुग्णालयामध्ये त्यांनी हृदयरोगतज्ञ ही पदवी प्राप्त केल्यानंतर तेथेच काही वर्ष अनुभव घेऊन इचलकरंजी येथे खाजगी रुग्णालयात काही वर्ष सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी पाच वर्षांपूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेवा बजावली होती.

त्यानंतर त्या पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयात आता सेवा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. सागर जाधव , डॉ. दीपक लादे, डॉ. मुरली चव्हाण तसेच शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, बंड्या तोरस्कर, सचिव दीपक सावंत, महादेव राऊत, रत्नाकर माळी, प्रदीप नाईक, संजय साळगावकर उमेश खटावकर, वासुदेव खानोलकर, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, शुभम मळकाचे तसेच सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, रवी जाधव आदी उपस्थित होते.

Sindhudurg