वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव उत्साहात संपन्न!

Google search engine
Google search engine

 

पाच दिवस विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर

मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील स्वयंभू श्री  शांतादुर्गा देवी  जत्रोत्सव  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त पाच दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जत्रोत्सवानिमित मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर झळाळून गेला होता.
६ जानेवारी रोजी  कलशारोहण वर्धापन दिन सोहळा आणि महाप्रसाद, मोफत औषधांसह सर्वसाधारण आरोग्य शिबीर , श्री देवी भराड़ी प्रासादिक भजन मंडळ, मसदे, पूजापाठ व पालखी सोहळा रात्री ११ वाजता (लोकजागर) आईचा गोंधळ कार्यक्रम झाला. ०७ जानेवारी रोजी सकाळी कृषी प्रदर्शन माहितीविषयक (महाराष्ट्र शासन), शालेय विद्यार्थ्याचा गुणगौरव- समता मंडळ आयोजन.स्नेह मेळावा (हळदी-कुंकूसहित) – विविध स्पर्धा.सायं. नवपाटवाडी ग्रामविकास प्रासादिक भजन मंडळ, रात्री तालुकास्तरीय नृत्यस्पर्धा.  ०८ जानेवारी रोजी श्रीदुर्गासप्तशती महायज्ञ / महाप्रसाद, रक्तदान शिबीर (महाराष्ट्र शासन),आरोग्य शिबीर- एसएसपीएम मेडिकल
कॉलेज आणि लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे., श्री पूर्णानंद स्वामी प्रासादिक भजन मंडळ, गोळवण-बोरकरवाडी यांचे भजन, समज प्रबोधनपर कीर्तन – ह.भ.प. गावडे महाराज-सिंधुदुर्ग, रात्रौ पूजापाठ व पालखी सोहळा, चेंदवनकर-गोरे दशावतारी मंडळनिर्मित नाटयप्रयोग. ९ जानेवारी रोजी संगीत भजन स्पर्धा.१० जानेवारी रोजी
कोकुलो कॅमलीन पुरस्कृत शैक्षणिक उपक्रम / स्पर्धा,सायं. दिपोत्सव व समता प्रासादिक भजन मंडळ वडाचापाट-थळकरवाडी हरीनाम संकीर्तन- श्रीमद्भागवत कथाव्यास – श्री रामचंद्र दास (इस्कॉन)(प.पू.श्री. राधागोविंद गोस्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य), महाप्रसाद,  रात्री बक्षीस वितरण. व त्यानंतर पूजापाठ पालखी सोहळा झाला. पालखी सोहळ्यास भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. पाच दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.