महिलांनी सहभाग घेण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग परिवहन विभाग ,पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे सोमवार १६ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान शुभारंभ करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी वाजता ९ सावंतवाडी जगन्नाथराव भोसले उद्यान मोती तलावासमोर सकाळी करण्यात येणार आहे. या ठिकाणावरून ही रॅली काढण्यात येणार आहे.यावेळी जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी महीलांनी हेल्मेट घालून गाडी घेऊन या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.