९ नोव्हेंबर रोजी माखजन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

माखजन |वार्ताहर :      संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे ९ नोव्हेंबर रोजी उ.बा.ठा सेना व डेरवण येथील भक्तश्रेष्ठ पंत वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर ९ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत माखजन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणार आहे.

हे शिबीर होण्यासाठी समाजिक कार्यकर्ते बाबू मोरे,व संजय शिंदे यांनी प्रयत्न केले आहेत.या शिबिरात हर्निया,अल्सर,अपेंडिक्स,मूळव्याध,टॉन्सिल,चरबीच्या गाठी,थायरॉईड,पित्ताशयातील खडे,इम्प्लांट रिमूवर,प्रोस्टेड ग्रंथी,कान,नाक,घसा,स्तनाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर,नाकाच हाड वाढणे,इसीजी,कानाच्या पडद्याची तपासणी,गर्भ पिशवी तपासणी आदी अनेक आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे.यामध्ये एखाद्याची सर्जरी करावी लागल्यास पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांची वालावलकर रुग्णालयात उपचार व सर्जरी केली जाणार आहे.

या शिबिरा वेळी माजी आमदार सुभाष बने,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,संतोष थेराडे,नंददीप बोरुकर,सुभाष नलावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आवश्यक त्या रुग्णांनी या शिबिराला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.