कणकवली(वार्ताहर): हरकुळ खुर्द-हुलेवाडी येथील योगेश मनोहर राणे (३३) यांच्या मालकीचा विहिरीवर बसविलेला विद्युत मोटरपंप ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते रात्री ९.३० वा.च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेला अशी फिर्याद योगेश मनोहर राणे यांनी कणकवली पोलिसात नोंदविली आहे.
सदरचा मोटरपंप(एचपी) तीन वर्षापूर्वी मनोहर राणे यांच्या घराच्या मागे रहात असलेल्या प्रमोद गोपाळ हुले यांच्या विहिरीवर बसविला होता. काल तो अज्ञाताने चोरून नेला. त्याची किंमत १५००/रू. आहे. याबाबत अज्ञाताविरूद्ध भादवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलिस हे.कॉ. वंजारे अधिक तपास करीत आहेत.