लोरे हेळेवाडी केंद्र अंतर्गत स्पर्धा संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोरे हेळेवाडी केंद्रस्तरीय घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिवन्या पचकर, रिया आग्रे, स्वेदांत तांबे व सौ. कविता हरकुळकर यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकावीला. वैभववाडी तालुक्यातील लोरे हेळेवाडी केंद्रात केंद्रप्रमुख गौतम तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी हस्ताक्षर सुधार उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे–
गट क्रमांक १-(इयत्ता पहिली व दुसरी) प्रथम क्रमांक- शिवंन्या युवराज पचकर (शाळा- लोरे मोगरवाडी), द्वितीय क्रमांक- अंजली संतोष सुतार (शाळा- भारत विद्यामंदिर लोरे नं.१ ), तृतीय क्रमांक -विभागून -निवेदी दशरथ बोबकर (शाळा- लोरे मोगरवाडी ), पूर्वी चंद्रकांत रावराणे (शाळा -भारत विद्यामंदिर लोरे नं.१),
गट क्रमांक २ ( इयत्ता तिसरी व चौथी) प्रथम क्रमांक – रिया शिवाजी आग्रे (शाळा- लोरे मोगरवाडी), द्वितीय क्रमांक- विभागून – शुभ्रा मुरारी कडू (शाळा – आचिर्णे कडूवाडी), देवेंद्र महेंद्र गोसावी (शाळा- लोरे मोगरवाडी ), तृतीय क्रमांक – नवमी महेश कदम (शाळा – लोरे मांजलकरवाडी),
गट क्रमांक ३- ( इयत्ता पाचवी ते सातवी ) प्रथम क्रमांक – स्वेदांत संतोष तांबे (शाळा – भारत विद्या मंदिर लोरे नं.१), द्वितीय क्रमांक – रुद्र लक्ष्मण शेटे (शाळा- गडमठ नं.१), तृतीय क्रमांक- विभागून – भार्गवी दीपक रावराणे (शाळा- भारत विद्या मंदिर लोरे नं.१), सान्वी गणपत सुतार (शाळा- गडमठ नं.१),
गट क्रमांक -४ (केंद्रप्रमुख व शिक्षक) प्रथम क्रमांक – सौ. कविता कमलाकर हरकुळकर (शाळा – भारत विद्या मंदिर लोरे नं.१), द्वितीय क्रमांक- सौ. संध्या संदीप शेळके (शाळा- गडमठ तेलीवाडी ), तृतीय क्रमांक- विभागून – श्री. वैभव दिनकर तळेकर (शाळा – आचिर्णे मधलीवाडी), सौ.संपदा संजय मुरकर (शाळा- आचिर्णे सिद्धाचीवाडी),
या स्पर्धेचे समन्वयक म्हणून केंद्रातील अक्षरमित्र श्री. युवराज पचकर यांनी काम पाहिले. श्री. प्रफुल्ल जाधव, श्री.आर. आर .पाटील, श्री. संदीप तुळसकर, श्री. मंदार चोरगे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व यशस्वी स्पर्धकांचे केंद्रप्रमुख श्री. गौतम तांबे यांनी अभिनंदन केले