सह्याद्री शिक्षण संस्था निवळी बावनदी हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाचे दिमाखात उदघाटन

शाळेचे माजी विद्यार्थी श्री संजय निवळकर यांच्याकडून श्रीफळ वाढवून झाली कार्यक्रमाची सुरुवात

रत्नागिरी : तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या बावनदी हायस्कूल च्या स्नेहसंमेलनाचे उदघाटन शाळेचे माजी विद्यार्थी,निवळी गावचे उपसरपंच भाजपा रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष श्री संजय निवळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.गावच्या विविध विकासात पुढे असणारे श्री संजय निवळकर यापूर्वी रस्ता, संरक्षण भिंत आदी कामे केली असून यापुढेही अशी कामे करत राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.शाळेच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शाळेच्या विविध उपक्रमांत योगदान दयावे. असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.यावेळी संस्था कमिटी ,शिक्षकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.