आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना युतीकडून ठाकरे गट महाविकास आघाडीचा धुव्वा
किंगमेकर निलेश राणे… दत्ता तेथे सत्ता… हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध ; प्रतिष्ठेच्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप युतीच्या विजयाचा सर्वत्र जल्लोष
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने ठाकरे गट महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. सरपंच पदी जेरॉन फर्नांडिस 242 मताधिक्याने विजयी झाले. तर 11 सदस्यही विजयी झाले आहेत. किंगमेकर निलेश राणे… दत्ता तेथे सत्ता… हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध अशी चर्चा सोशल मिडीयात रंगली होती.
विजया नंतर प्रतिक्रिया देताना जे्रॉन फर्नांडिस म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन तसेच भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांचा खंबीर पाठिंबा आम्हाला मिळाला. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत हे गेले 15 दिवस आचरा येथे माझ्या व सर्व सदस्य यांच्या प्रचारासाठी सातत्याने तन आणि मनाने सोबत राहिले. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व सर्व सहकारी कार्यकर्ते आचरा वासियांना यांच्या मेहनतीतुन मिळालेला हा विजय आहे. सर्व मतदार यांचे जाहीर आभार जे्रॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले आहेत.
सरपंच उमेदवार मते
जेरॉन फर्नांडिस : 1435
मंगेश टेमकर : 1193
जगदीश पांगे : 70
नोटा : 34
अश्या स्वरूपात सरपंच उमेदवार यांना मतदान झाले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती नीलमा सावंत, माजी सभापती सुनील घाडीगावकर, राजू प्रभूदेसाई, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी उपासभापती राजू परुळेकर, संतोष कोदे, संतोष गांवकर, दीपक पाटकर, दीपक सुर्वे, शेखर कांबळी, विजय निकम, प्रफुल्ल प्रभू, दत्ता वराडकर, राजन पांगे, अभि सावंत, मनोज हडकर, बाबू कदम, दया देसाई, महेश सारंग, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, राकेश सावंत, यासह शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गांवकर, नीलम शिंदे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.