उडान महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेत देव, घैसास, कीर महाविद्यालयाची पूजा परमार तृतीय

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उडान महोत्सव देवरुख येथील आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयात घेण्यात आला. या महोत्सवात देव, घैसास,कीर महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यानी पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व व सर्जनशील लेखन या चार स्पर्धेत सहभाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयाची द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पूजा इंद्रमल परमार हिने तृतीय क्रमांक मिळविला.

सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्याचे संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, डीएलएलई विभागप्रमुख प्रा.दिप्ती कदम, प्रा.विनय कलमकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.