चांगले संस्कार आत्मसात करा! सोनू सावंत यांचे प्रतिपादन

Google search engine
Google search engine

बांदिवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप व गुणगौरव कार्यक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर : गोंधळ या धार्मिक कार्यक्रमात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा एक वेगळा उपक्रम बांदिवडे गावात मागील काही वर्षे राबविला जात आहे. मुलांनी चांगला अभ्यास करून स्वतःचे व गावाचे नाव रोशन करावे हाच उदात्त हेतू यामागे आहे.हा उपक्रम यापुढे सुद्धा बांदिवडे प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने राबविला जाईल. शालेय जीवनातच चांगले संस्कार, चांगले विचार आत्मसात करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मुंबई येथील ज्ञानसागर विद्यालयाचे शिक्षक व बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष सोनू सुधाकर सावंत यांनी येथे केले.
बांदिवडे येथील श्री देवी पावणाई भगवती मंदिर येथे दुसऱ्या वार्षिक गोंधळ कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावी परीक्षा प्रथम दोन क्रमांक विध्यार्थी, नवनिर्वाचित सरपंच, सदस्य सत्कार व अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप माध्यमिक शिक्षक सोनू सावंत यांच्या वतीने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विश्वनाथ परब यांनी सोनू सावंत यांच्या दातृत्वा बद्दल आभार मानले.

यावेळी सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी, सदस्य नारायण परब, सौ स्वाती आईर, इतर सदस्य यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच आशु मयेकर, श्री. साई प्रभु, आप्पा गोविंद परब, दिनेश परब, मधुकर परब, आनंद परब, नारायण परब, चंद्रकांत परब, सागर परब, अनिल परब, मनोहर परब, उदय सावंत, आबा आईर, पोलीस पाटील नरेश मसुरकर, राजेंद्र परब,जगन्नाथ परब, शिवराम परब, वासुदेव सावंत, अशोक परब, प्रवीण परब, नागेश परब, सौ नीता सोनू सावंत, सौ गौरी प्रथमेश नाईक, प्रथमेश नाईक, राजेश दळवी सिताराम परब, प्रकाश परब, लाडोबा परब, प्रवीण परब, के.के. सावंत, प्रतीक परब, साईप्रसाद प्रभू, नरेंद्र जाधव, नयन भट, विनय सावंत, नितीन परब, अशोक परब, उल्हास परब, विष्णू सावंत, चंद्रशेखर परब, रमेश परब, गणपत सावंत, अनुराधा गावकर, प्रशांत परब, उदय परब, विकास भट, मंगेश चव्हाण, यशवंत परब, उत्तम परब, शैलेश राणे, सुधीर घाडी
आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल आनंद परब यांनी आभार मानले.