24 पैकी 17 ग्रामपंचायती व 187 पैकी 132 सदस्य भाजपाकडे,सिंधुदुर्गात पक्षाची ताकद आणखी मजबूत 

भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती मतदारांनी दिली – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुनगरी l प्रतिनिधी : सर्व सामान्य नागरिकांसाठी ज्या योजना भारतीय जनता पार्टीने राबविल्या व त्याला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. व ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालामुळे भाजपला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. राज्यपालाप्रमाणे सिंधुर्गातही भाजपला चांगले यश आले असून ग्रामपंचायतच्या एकूण 187 सदस्य संख्ये पैकी 132 ग्रामपंचायत सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. एकूण 24 ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असून निवडणुका झालेल्या 22 पैकी 15 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्यामुळे या जिल्ह्यात भाजपने आपली ताकद आणखी मजबूत केली आहे. जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपली ही पहिलीच निवडणूक असून ही विजय सलामी आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुनगरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

कणकवली मतदार संघात आमदार नितेश राणे, कुडाळ मतदार संघात निलेश राणे सावंतवाडी मतदार संघात राजन तेली यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री नारायण राणे या भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले व मतदारांनी भाजपला कौल दिला त्याबद्दल सर्वांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी अभिनंदन केले.

राज्यात ग्रामपंचायतच्या या निवडणुकांमध्ये भाजपला चांगला प्रतिसाद मतदारांनी दिला आहे. भाजप महायुतीला 842 जागा मिळाल्या 320 जागांवर समाधान मानावे लागले इतर पक्षांना 190 जागा मिळवता आल्या. सिंधुदुर्गातही मिळालेले यश पाहता भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी बळकट झाली आहे. जिल्ह्यात 24 ग्रामपंचायती पैकी फक्त पाच ग्रामपंचायती ठाकरे शिवसेना गटाला मिळवीता आल्या आहेत. व ग्रामविकास आघाडीला दोन ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. या ग्रामपंचायत ही भाजपकडेच आहेत. हा निकाल पाहता जवळपास 70% यश या जिल्ह्यात भाजपला मिळाले आहे. ठाकरे गटाने पाच ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असल्या तरीही यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर विजय मिळवता आला मात्र रामेश्वर बेळणे व वांयगणी या तीन ग्रामपंचायतीचे सरपंच उद्धव ठाकरे गटाचे विजयी झाले या तिन्ही ग्रामपंचायत वर एकही सदस्य त्यांना निवडून आणता आला नाही या तीनही ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य भाजपचेच निवडून आले आहेत. यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या भडगाव आचरा पेंडूर मातोंड वळिवंडे या ग्रामपंचायती भाजपने आपल्या ताब्यात आणल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात शतपत प्रतिशत भाजप हा नारा खरा ठरत आहे व ही लोकसभा निवडणुकीची नांदी असल्याचेही प्रभाकर सावंत म्हणाले.

पहिलीच निवडणूक ही विजयाची सलामी

मी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर आपली पहिलीच निवडणूक होती. या जिल्ह्यात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यात एकजुटीने काम केले व मतदारांनीही चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. व विजयाची सलामी आपल्या कारकीर्दीला मिळाली त्याबद्दल सर्व भाजप नेते भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांचेही प्रभाकर सावंत यांनी धन्यवाद व्यक्त केले.

भाजप सरकारच्या चांगल्या कामाचा परिणाम

सर्वसामान्य जनतेसाठी भाजप सरकारच चांगले काम करू शकते त्यामुळेच या निवडणुकीत मतदारांनी भाजपला प्रतिसाद दिला आहे. राज्यातील आकडेवारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकडेवारी पाहता भाजपला मतदारांनी चांगला कौल दिला आहे. सरकारने राबविलेले शेतकरी सन्मान योजना आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, रोजगारासाठी विश्वकर्मा योजना मोफत धान्य पुरवठा योजना महिलांसाठी बस प्रवासात सवलत असा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या आधारे भाजप सरकारने तळागाळापर्यंत काम केले आहे व त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करू शकते असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाल्यामुळे भाजपला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.