आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हेत येथे बीएसएनएल टॉवरचा शुभारंभ

वैभववाडी | प्रतिनिधी
हेत येथे बीएसएनएल टॉवरचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध भागात बीएसएनएल चे टॉवर मंजूर झाले आहेत. चार दिवसांपूर्वी शिराळे येथील बीएसएनएल टॉवरचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता. हेत येथे बीएसएनएल टॉवर मंजूर झाल्याने परिसरातील अनेक गावांचा नेटवर्क चा प्रश्न सुटणार आहे. शुभारंभ प्रसंगी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, हेच सरपंच कांचन कांबळे, एकनाथ फोंडके, मनोहर फोंडके, बाबू खानविलकर, संतोष फोंडके, उत्तम फोंडके, ग्रामसेवक श्री कांबळे, उपळे माजी सरपंच देवानंद पालांडे, मुख्याध्यापक श्री कांबळे तसेच भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.