चिपळूण येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे गर्भाशय आणि गर्भाशय ग्रीवा या दुर्मिळ कर्करोगाने पिडीत महिलेवर यशस्वी उपचार

चिपळूण | प्रतिनिधी : येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर येथे गर्भाशय आणि गर्भाशय ग्रिवाच्या दुर्मिळ कर्करोगावर यशस्वी उपचार झाले . हा स्त्री प्रजनन प्रणालीमध्ये आढळून येणारा एक कर्करोग आहे. जेव्हा गर्भाशयाच्या निरोगी पेशी बदलतात आणि अनियंत्रित वाढ होते तेव्हा कर्करोग सुरू होतो, ज्याला ट्यूमर म्हणतात. ट्यूमर कर्करोगजन्य (घातक) किंवा सौम्य असू शकतो आणि घातक ट्यूमर (मेटास्टेसाइज) वाढू शकतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो.गर्भाशय आणि गर्भाशय ग्रिवा यांचा कर्करोग एकाच वेळी आढलून येणे हे अतिशय दुर्मिळ आहे जगा मधे जवळपास १२ ते १५ केसेस नोंदवल्या आहेत.

एका 57 वर्षीय महिलेला गेल्या 2 महिन्यांपासून योनीतून पांढरा स्त्राव येत होता. तपासणीअंती तिला गर्भाशय तसेच गर्भाशय ग्रिवेचा दुर्मिळ प्रकारच्या दोन कर्करोगाचे निदान झाले. चिपळूण येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरमधील ट्यूमर बोर्डाने तिच्यासाठी बहुविध उपचार पद्धतीचा निर्णय घेतला. तिला शस्त्रक्रिया तसेच केमोथेरपी रेडिएशन थेरपीचा सल्ला देण्यात आला.सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ सचिन कदम यांनी तिच्यावर गर्भाशय, द्विपक्षीय अंडाशय, गर्भाशय ग्रीवा, योनीचा भाग, लिम्फ नोड्स आणि ओमेंटम काढून शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ अभिषेक पुरकायस्थ यांनी रेडिएशन थेरपी दिली आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ संजय अग्रवाल यांनी समवर्ती केमोथेरपी दिली. आता रुग्ण कर्करोगमुक्त झाली असून ती नियमित फॅालोअप घेत आहे.