१२ पैकी १० ग्रामपंचायतचे सरपंच आणि ७० सदस्य भाजपचे विजयी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज राष्ट्रवादी ,विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला थारा दिला नाही
माझे मतदार मला भाऊ,मुलगा समजून प्रेम देतात त्यामुळे विरोधकांना मी उत्तर देत नाही जनताच देते
आमदार नितेश राणे यांनी जनता,आणि भाजपा कार्यकर्ते,पदाधिकारी यांचे मानले आभार
कणकवली ; कणकवली विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक १२ पैकी १० सरपंच आणि ७० सदस्य भाजपचे येथील मतदारांनी निवडून दिले आहेत.निकालातून जनतेचा कौल हा माझ्या कामाची पोहोच आहे .लोकांना महायुती मान्य आहे,केलेली विकासकामे पाहून लोकांनी आम्हाला साथ दिली. आणि पहिल्या टप्प्यात जसा विश्वास टाकला तसाच तो पुन्हा ही या निवडणुकीत व्यक्त केला आहे.माझे विरोधक चुकीचे राडे रंगवत होते,चुकीचे आरोप आणि आंदोलने माझ्या विरोधात करत होते. त्यांना जनतेने मतपेटीतून माझ्यावर विश्वास व्यक्त करून उत्तर दिले आहे. मला येथील जनता भाऊ,मुलगा,मानते त्यामुळे माझ्यावर चुकीची टीका करणाऱ्या विरोधकांना येथील जनता मतपेटीतून उत्तर देत राहिली आणि भविष्यातही देईल असा विश्वास भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मतदार संघातील कणकवली देवगड वैभववाडी या तालुक्यातील ग्रामपंचायत निकालात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्वाधिक सरपंच आणि सदस्य यांची मतदारांनी निवड केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते. ते म्हणाले,
१२ पैकी १० ग्रामपंचायतचे सरपंच आणि ७० सदस्य भाजपचे येथील मतदारांनी विजयी केले आहेत.कणकवली विधानसभा मतदारसंघात हा भाजपचाच आहे हे पुन्हा दाखवून दिले आहे. या विजयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत मार्गदर्शन आणि बूथ अध्यक्ष पासून प्रत्येक पदाधिकारी ,कार्यकर्त्यांचे केलेल्या कामामुळे हे यश मिळालेले आहे असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांना विकास निधी दिला आणि जनतेच्या विकासाच्या पेक्षा पूर्ण केल्या. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत आल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगून पालकमंत्री चव्हाण यांच्या आभार व्यक्त केले.
१२ पैकी १० ग्रामपंचायतचे सरपंच आणि ७० सदस्य भाजपचे विजयी झाले आहेत.बेळणे आणि रामेश्वर दोन गाव वगळता सर्वठिकाणी भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.
होऊदे चर्चा या कार्यक्रमातून उबठा सेनेने माझ्यावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून जनतेने दिलेले आहे असे आमदार नितेश राणे सांगितले.
विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला थारा दिला नाही
विरोधकांनी माझ्या मतदार संघातील अल्पसंख्यांक,मुस्लिम समाजात माझे चुकीचे व्हिडिओ करून दाखवले. मात्र त्यांचा कोणताही प्रभाव मतदानावर झालेला नाही. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज हा राष्ट्रवादी आहे. त्याने मला आपलेसे मानलेले आहे. यापूर्वी नांदगाव, उंबर्डे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माझ्यासाठी मतदान करून सरपंच आणि सदस्य माझ्या भाजपच्या विचाराचे निवडून दिले.यावेळी देवगड ठाकूरवाडी यासारख्या गावात भाजपचा सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडून दिलेला आहे.असे त्यांनी सांगितले.