रुण ग्रामविकास मंडळ पराडकरवाडी, मुंबईचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून साघला गेला आपुलकीचा संवाद

लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे रुण ग्रामविकास मंडळ पराडकर वाडी, मुंबई यांचा स्नेह मेळावा वेळात शारदाश्रम दादर येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आपुलकीचा संवाद साघला गेला.
मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात दुर्मिळ झालेली आपल्या माणसांची भेट या माध्यमातून व्हावी. अन यातून पुढे प्रगती साधावी. या हेतूने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मौजे रुण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पराडकर आणि इतर कमिटी सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यादरम्यान केतकी शांताराम पराडकर या छोट्या बालिकेने स्वागत गीत सादर केले. स्वागत समारंभ चालू असतानाच मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्री बाबा कदम आणि त्यांचे सहकारी श्री शेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत झाल्यावर बोलताना श्री बाबा कदम यांनी ही संकल्पना खरोखरच चांगली असून आजच्या काळात याची खूप गरज आहे. म्हणून कौतुकाची थाप दिली. यानंतर या आधीच्या पिढीने मुंबईत असणाऱ्या आपल्या माणसांच्या सुखदुःखात उभे रहात वाडीची मजबूत बांधणी केली त्या पिढीतील काही दिवंगत झाले त्यांचे वारस आणि हयात असणारे इतर यांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमात महिला वर्ग फार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांचा हळदी कुंकू सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर सृष्टी मोरे, इरा सुर्वे, अर्णवी, त्रिशा सुर्वे या लहान मूर्तिनी नृत्य सादर केली. नक्षत्रा खानविलकर हिने गीतापठन सादर केलं.दुसऱ्या सत्रात अनेक मान्यवरांनी या सोहळ्यात उपस्थिती दाखविली. या मध्ये मैत्री फाउंडेशन अध्यक्ष मंगेश डांगे, रुण बौद्धजन सेवा संघ मुंबई अध्यक्ष समीर जाधव, माजी अध्यक्ष प्रभाकर जाधव, गोंधवली वाडी मुंबई मंडळ अध्यक्ष उमाजी जोंधळे, रुण ग्रामविकास मंडळ मुंबई चे माजी सचिव राकेश डोंगरकर हे मान्यवर होते त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यात श्री समीर जाधव,श्री मंगेश डांगे यांनी या संकल्पनेची प्रशंसा केली.
या नंतर मौजे रुण ग्रामविकास मंडळ पराडकरवाडी, मुंबई यांनी वाडीतून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणार्या १४ जणांचा सन्मान करण्यात आला. काळाची पाऊले ओळखून यशोशिखरावर मेहनतीने पोहचलेली दुर्लक्षित कर्तृत्व त्यांना नव्या पिढीसमोर आणून त्यांना प्रेरणा द्यावी या हेतूने या कार्यक्रमा चे आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौजे रुण ग्रामविकास मंडळ पराडकर वाडी मुंबईच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थांनी मेहनत घेतली.