रत्नागिरी | प्रतिनिधी :रत्नागिरीतील विविध सामाजिक उपक्रमात, अन्यायाविरुध्द पुकारलेल्या आंदोलनात सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी झगडणारे, त्यांना न्याय मिळवून देणारे शहरानजिकच्या कारवांचीवाडी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कुळ्ये यांना ‘समाज सेवक’ या पुरस्कारने कुणबी समाजाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी तालुका कुणबी विकास सहकारी पतपेढी मर्या.संस्थेच्या कोतवडे शाखेच्या कार्यक्रमात सामाजिक कार्येकर्ते तानाजी कुळये यांचा हा नागरी सत्कार पतपेढीचे अध्यक्ष संदीप गावडे, कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा अध्यक्ष रामभाऊ गराटे, बविआचे अध्यक्ष सुरेश भायजे, कर्मचारी सेवा संघांचे अध्यक्ष संतोष रावणंग आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते तानाजी कुळ्ये यांच्या सामाजिक कार्यातील सहभाग पाहिला तर सन 1994 कारवांचीवाडी येथे दारूबंदीच्या चळवळीत महत्वपूर्ण योगदान राहिले. सन 1999 महिला मंडळ, युवक मंडळ स्थापना – सामाजिक उपक्रम सुरुवात केली. सन 2003 मालगुंड धावडेवाडी येथे साळवी विरुद्ध मोठा संघर्ष करून पाणी प्रश्न मार्गी लागला. सन 2003 मांजरे विल्ये येथील समाज भगिनीवर अत्याचारा विरुद्ध आवाज उठवून अत्याचार करणाऱया खोतावर विरुद्ध न्यायालयीन लढाई लढून खोत इतर 14 आरोपीना 1 महिना शिक्षा संघर्ष यशस्वी लढा ठरला.
सन 2003 बोंड्ये सुतारवाडी पायवाट व पाणी प्रश्नासाठी तेथील खोताविरुद्ध संघर्ष केला. 2008 – पोमेंडी बुद्रुक बाणेवाडी येथे घरी काम करणाऱया महिलेवर कोयत्याने पायावर वार करून एक पाय निकामी केल्याच्या विरुद्धात ग्रामीण पोलीस स्टेशनला घेराव केस दाखल झाल्यावर अन्याय करणाऱया खोताला कोर्टाने 5 महिने शिक्षा केली होती. 1/1/2010 रोजी कोंडये तालुका संगमेश्वर येथे जमीन प्रश्नावर समाजावर अन्याय करून चुकीचा न्याय देणाऱया तहसीलदार यांना सकाळी 11 ते रात्रौ 1 वाजेपर्यंत कार्यालयात कोंढून ठेवले, पुढे याचा परिणाम म्हणून 2700 सातबारे उतारे समाजाच्या लोकांच्या नावावर झाले. याच दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.
सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे लाचखोर व गरिबांना लुटाणाऱया क्लास 2 च्या अधिकारी निलंबित करवा म्हणून सिव्हिल सर्जनला घेराव. याचा परिणाम म्हणून शासनाने त्रिसदस्य कमिटी नेमून चौकशी अंती डॉ. झिरवणकर याचे निलंबन झाले होते. पाली येथील काशिनाथ बेंडल यांच्या मुलाचा स्पर्श दंशाने मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जी केली म्हणून सिव्हिल हॉस्पिटल सर्जन यांना घेराव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपुऱया आरोग्य सुविधा विरोधी धडक मोर्चा काढला. 2011 – पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी ग्रामपंचायत जल स्वराज्य प्रकल्प भ्रष्टाचार विरुद्ध आमरण उपोषण. याची दखल घेत तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या सोबत यशस्वी चर्चा करून उपोषण स्थगित केले होते. यामुळे ग्रामपंचायत 1 कोटी 5 लाखचा निधी प्राप्त झाला होता.
पोमेंडी बुद्रुक रेल्वेपुलावर शेजारी सतत दरड कोसळून होणाया नुकसानी विरुद्धात कोकण रेल्वे प्रशासनाला जाब विचारून तब्बल 3 तास कोकण रेल्वे रोखून धरला. यामुळे चार कोटी नुकसान भरपाई मिळाली. रत्नागिरी सेतू कार्यलयाचीव कामकाजाची वेळ वाढविण्यासाठी सेतू कार्यलयाला लॉक लावले यामुळे कामकाज वेळ वाढविण्यात आला. यामुळे जातीचे, उत्पन्न दाखले व इतर शासकीय कार्यलयात येणाया सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. अशापकारे अनेक आंदोलनात सहभाग, आवाज उठवत त्यांना कायद्याच्या कारवाईला सामोरे देखील जावे लागले होते.