Top Places To Visit In November: नोव्हेंबरमध्ये फिरण्याचा प्लान बनवताय तर भारतातील ही आहेत बेस्ट ठिकाणे

मुंबई: सगळीकडे सण-उत्सवाचा उत्साह असताना थंडीलाही सुरूवात होत आहे. जर तुम्हाला थंडीचा मौसम आवडत असेल तर नोव्हेंबर महिना हा फिरण्यासाठी अतिशय परफेक्ट आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक प्रकारचे सण येतात ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संस्कृतीही पाहायला मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही जागांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी जाऊ शकता.

कच्छचे रण,गुजरात – थंडीच्या दिवसात कच्छचे रण येथील सफेद वाळू अतिशय मॅजिकल दिसते. हे ठिकाण तेथील सुंदरतेसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे रण उत्सव साजरा केला जातो. परदेशातूनही पर्यटक येथे येतात.

भरतपूर, राजस्थान – केवलादेव नॅशनल पार्क ज्याला भरतपूर बर्ड सेंचुरी नावाने ओळखले जाते. पक्षी प्रेमींसाठी ही जागा अतिशय परफेक्ट आहे. येथे पक्ष्यांच्या साधारण ३७० प्रजाती आहेत. नोव्हेंबरमध्ये अनेक प्रवासी पक्षी जसे पेलिकन, गीज, गिधाड तसेच ब्लू टेल्ड बी ईटर येथे येतात. अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन आणि सायबेरियातून मोठ्या संख्येने पक्षी येथे येतात.

गोवा – दरवर्षी गोव्यामध्ये आशियातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल साजरा केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये हजारो प्रसिद्ध कलाकार, निर्माता उपस्थित असतात. तसेच जगभरातील सिनेमे या ठिकाणी दाखवले जातात.

अमृतसर, पंजाब – अमृतसरमध्ये गुरू पर्वाचा सण येथे अतिशय धामधुमीत साजरा केला जातो. या दरम्यान येथील सुवर्णमंदिर सजवले जाते. शहर अतिशय सुंदर दिसत असते.

शिलाँग, मेघालय – दरवर्षी नोव्हेंबरमध्ये शिलाँग चेरी ब्लॉसम फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. या दरम्यान येथे परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे आर्टिस्ट येतात. येथील संस्कृती, खाणेपिणे, आर्ट तसेच म्युझिकबाबतही अनेकजण जाणून घेण्याची इच्छा ठेवतात.