रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सावंतवाडीत ‘बाईक रॅली ‘

हेल्मेटचे महत्व पटविण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : वाहतूक नियमांचे महत्त्व नागरीकांना समजण्यासाठी सोमवारी सावंतवाडी शहरात “रस्ता सुरक्षा अभियान” राबविण्यात आले. हेल्मेटचे महत्व समजून घेऊन नागरीकांनी हेल्मेटचा वापर करून स्वतःचा जीव वाचवावा, या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर काळे यांनी अभियान शुभारंभ प्रसंगी दिली.

यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे, अधिकारी विजयकुमार अल्लम्मावार, अधिकारी जावेद शिखलगार, सचिन पोलादे, अभिजीत शिरगावकर, सुनील खंदारे, गणेश जाधव,प्रकाश गावडे,संदीप चव्हाण,वाहतूक पोलीस सुनील नाईक, राजा राणे, अभयकुमार म्हापसेकर, विल्सन, रुपेश रसाळ, आगा, जगदीश, राहुल राठोड, सुधीर पराडकर, गवंढळकर, नाईक, तावडे, धर्मेंद्र सावंत, महादेव बामणे आदी उपस्थित होते.
यावेळी शहरात रस्ता सुरक्षा अभियानाची रॅली काढण्यात आली. या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे अभियान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सावंतवाडीत राबवण्यात आले.