दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत सहकार पॅनलचा विजय…

दापोली l प्रतिनिधी:  दापोली तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीत रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक, व विद्यमान चेअरमन श्री. सुधीर कालेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने दणदणीत विजय साकार करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळविला असून परिवर्तन पॅनलच्या सौ. स्मिताली संदिप राजपुरे या विजयी झाल्या आहेत.

दापोली तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिरात पार पडली. सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणी वैयक्तिक प्रतिनिधी मतदार संघातून धनंजय गोरे 76, विकास लिंगावळे 38, तर राजेंद्र पेठकर यांना 161 मते मिळून राजेंद्र पेठकर हे विजयी ठरले. महिला प्रतिनिधी गटातून वैशाली इदाते 123, रेश्मा नवरेकर 173, मानसी विचारे 114, वर्षा शिर्के 184 मते मिळाली यामध्ये रेश्मा नेवरेकर व वर्षा शिर्के हे विजयी झाले.

इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मधून सचिन होडबे 75, तर सुनिल पुळेकर 234 मते मिळाली या गटातून सुनिल पुळेकर हे विजयी झाले. अनुसुचित जाती जमातीमधून वैशाली इदाते 96, भगवान घाडगे 218 मते मिळाली यामध्ये भगवान घाडगे हे विजयी झाले. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मधून श्रीराम इदाते 125, संजय महाडीक यांना 191 मते मिळाली यामध्ये संजय महाडीक हे विजयी झाले. तर सहकारी संस्था प्रतिनिधी मधून अनंत करबेले 27, तानाजी कालेकर 27, सुधिर कालेकर 32, विठठल खोत 18, दत्ताराम जाधव 24, प्रभाकर झगडे 25, संतोष धावरे 26, रमेश पवार 26, स्मिताली राजपुरे 24, प्रितम रूके 20, वसंत शिंदे 26, प्रदिप सुर्वे यांना 27 मते मिळाली. या मतदार संघात विठ्ठल खोत हे पराभूत झाले.

या निवडणूकीनंतर मत व्यक्त करताना सहकार पॅनलचे प्रमुख श्री सुधीर कालेकर म्हणाले की, अवसायानात जात असलेला दापोली खरेदी विक्री संघ हा आम्ही नफ्यामध्ये आणला. हा संघ चालवताना आम्ही कोणतेही राजकारण केले नाही, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याची मदत घेतली. आमच्या पॅनलमध्ये शिवसेना, भाजप, आरपीआय, राष्ट्रवादी या सर्व पक्षांचा समावेश होता. मतदारांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे. तो पुढील काळात देखील सार्थ ठरवू व तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू.