परकार परफ्युम्सकडून ब्रँडेड डिओड्रॉण्टस व अत्तर सेलची घोषणा

ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणि मोठ्या सवलती

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील परकार कॉमप्लेक्स येथील फ्राग्रन्स शॉप नंबर ७५ या दालनात दिवाळी निमित्त ६ ते २० नोव्हेंबरपर्यंत बिग सेल आयोजित करण्यात आला आहे. ज्यामधये सर्व प्रकारचे डिओड्रॉण्टस, पर्फुम्स, अत्तर, कॉस्मेटिक्स व एअर फ्रेशर्स कमी किमतीत अनेक उत्पादन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
परकार फ्राग्रान्सचे मालक साद परकार यांनी सांगितले की, दिवाळीच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजे दि. ६ ते २० नोव्हेंबरपर्यंत हा बिग सेल चालेल. चिपळुणातील ग्राहकांना मुंबई अत्तर गल्ली येथे खरेदी करण्यासाठी जाण्याची गरज नाही. असेच अत्तर व बॉडी स्प्रे परकार फ्राग्रन्स येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत. कॉलेजच्या मुलांपासून ते प्रौढांची आवड लक्षात घेऊन २०० ते २००० रूपयांपर्यंत तोला असलेले अत्तर उपलब्ध करण्यात येणार आहे. पूर्वीपेक्षा अत्तर वापरण्याचा प्रमाण वाढले आहे. या बाबी लक्षात घेऊन विविध प्रकारचे ब्रॅण्डेड बॉडी स्प्रे व केवढा, हिना, मोगरा व तरुणांसाठी रेहान, अरबाज, ब्रुट, रॉयल मिराज, सिगार यासारखे अत्तर उपलब्ध होणार आहेत. तरी या बिग सेल ठिकाणी एकदा भेट द्या, असे आवाहन परकार परफ्युमचे मालक साद परकार यांनी केले आहे.