प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
मंडणगड : प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील मांदिवली येथील मे. हनिफा हरून फजलानी, मांदिवली बॉक्साईट भूखंड या बॉक्साईट मायनिंगच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत जनसुनावणी मागील महिन्यात मांदिवली येथे आयोजित करण्यात आली होती. हि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी तुर्तास्थ स्थगित करण्यात आली होती. कंपनी प्रशासनाने आपली कामाची भूमिका हि मांदिवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांप्रती सर्वसमावेशक असायला हवी होती. अशी शक्यताही सुनावणी दरम्यान दिसली नाही. त्यामुळे प्रकल्प विरोधकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत प्रकल्पाला विरोध केला आहे.
दरम्यान झालेल्या गदारोळाच्या कारणाने तुर्तास्थ स्तगीत करण्यात आलेल्या सुनावणी नंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. एखाद्या उद्योग प्रकल्पाच्या निर्मितीत पर्यावरणाबाबतच्या नियमांचे पालन, परिसराचा सर्वांगीण विकास व स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगार निर्मिती या काही मुलभूत बाबीचा विचार होणे गरजेचे आहे. उद्योग प्रकल्पाच्या एकूण प्रक्रेयेत स्थानिक भूमिपुत्रांचा समावेश असणे तितकेच म्हत्वाचे असल्याने प्रकल्पाला विरोध का होतोय याचा सारासार विचार कंपनी व्यवस्थापकांनी करायला पाहिजे होता. मात्र तसे होत नाही.
दापोली व मंडणगड या दोन तालुक्यांच्या किनारी भागात मुबलक प्रमाणात बॉक्साईट खनिज आढळते. याआधी आशापुरा माईन केम या कंपनीने या दोन्ही तालुक्यांच्या किनारी भागांतील काही गावांमध्ये असलेल्या बॉक्साईट खनिजाचे उत्खनन करून परदेशात व परराज्यात मोठ्या प्रमाणात निर्यात केले आहे. अजूनही या खनिजाचे पूर्वी उत्खनन करून ठेवलेल्या साठ्यांची निर्यात सुरु आहे. सद्याचा प्रस्तावित मांदिवली बॉक्साईट प्रकल्प हा आशापुरा माईन केम कंपनी प्रकल्पापासून काही किमी अंतरावर आहे. त्यामुळे बॉक्साईट प्रकल्पाविषयी असलेली माहिती, त्याचे फायदे व तोटे मांदिवली पंचक्रोशीतील नागरिकांना नवीन नाहीत, शिवाय या गावांसामोरूनच बॉक्साईटची डंपरच्या सहाय्याने वाहतूक झाली असल्याने प्रकल्पाविषयी गांभीर्य येथील नागरिकांना आहे. त्यातच जर कंपनी व्यवस्थापकांनी ठराविक लोकांना हाताशी धरून प्रकल्पाची कामाची मांडणी करताना ग्रामस्थांना गृहीत धरल्यामुळे विरोध व समर्थन अशी स्थिती निर्माण होणे साहजिक निर्माण झाली आहे.
सध्या मेक इन इंडियाचे मोठे वारे देशात वाहत आहेत या पार्श्वभूमीवर येथील बलस्थानांचा विचार करता या तालुक्यांना मोठ्या उद्योग प्रक्लापांची नितांत आवशक्यता आहे. त्या आवश्यकतेच्या दृष्टीने पावले उचलण्याचीही गरज आहे. पायाभुत सुविधांसह आवश्यक कच्चा मालाचीही मंडणगड व दापोली परिसरात सहज उपलब्धता होऊ शकते स्थानीक पातळीवर मोठे उद्योजक निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे धोरण आखून त्यास राजकीय व्यासपिठावर मोठे प्रोत्साहन मिळण्याची आवश्यकता देखील आहे. मायनिंग संदर्भातील केवळ कच्चा मालाची वाहतूक करणे एव्हडे पुरेसे नसून आर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या खनिजांपासून निर्मिती होणाऱ्या मोठे उद्योग प्रक्लापांची स्थापन होणे आवश्यक आहे. व त्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्नांची आवश्यकता आहे. असे असले तरी आजवर दोन तालुक्यातील असलेल्या मायनिंग उत्खननामुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगार मिळण्या पेक्षा अडचणीच अधिक निर्माण झाले आहेत हा अनुभव पाठीशी असल्याकारणाने मांदिवली बॉक्साईट मायनिंगला परिसरातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे चित्र आहे जन सुनावणी दरम्यान कंपनी व्यवस्थापनाकडून जी माहिती देण्यात आली त्या माहितीच्या अनुषंगाने उत्खनन होत असलेल्या परिसरामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरात पाणी दूषित होणे उत्पन्नाकरिता विस्फोट घडवून आणणे हे प्रकार होणार आहेत याचबरोबर जैवविविधतेची देखील मोठी हानी होणार आहे वन व पर्यावरण विभागाची मुदत संपलेली एनओसी व आकडेवारी या अहवालात लावण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे एकूणच मांदिवली मायनिंगमुळे परिसरातील नागरिकांना फार मोठे संकट ओडवणार असल्याने या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला आहे