अनधिकृत वाळू साठा प्रकरणी देवली येथील जमीन मालकांना महसूलच्या नोटिसा

 

मालवण | प्रतिनिधी : देवली सडा येथे दोन ठिकाणी सुमारे २०० ब्रास अनधिकृत वाळू साठा केल्या प्रकरणी मालवण महसूल प्रशासनाने सहा जमीन मालकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार नोटिसा बजावणीची कार्यवाही केली आहे. अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सोमवारी दिली आहे.महसूल पथकाने १३ जानेवारी रोजी मध्यरात्री केलेल्या कारवाईत दोन सर्व्हे नंबर क्षेत्रात अनधिकृत वाळू साठा सापडून आला होता. महसूल विभागाने केलेल्या पंचनामा व प्राथमिक मोजमाप नुसार हा वाळूसाठा सुमारे २०० ब्रास असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले आहे.

वाळू परवाने नसताना अथवा वाळू साठ्या बाबत पास उपलब्ध नसताना अनधिकृत वाळू उत्खनन करून वाळू साठा केल्या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व अन्य शासन परिपत्रक तसेच अधिसूचना नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये. असेही म्हटले आहे.