पाटपन्हाळे (वार्ताहर) इस्रो अभ्यासभेटीसाठी निवड झालेली गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढर काळसुर शाळेमधील गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी कु.अनुश्री चंद्रकांत गिजे हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुमारी अनुश्री चंद्रकांत गिजे हिला मनसे कौंढर काळसूर शाखेच्या वतीने केले आर्थिक सहकार्य केले. इस्रो अभ्यासभेटीसाठी निवड हि नक्कीच शाळा व गावासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे.
या गावची सुकन्या कुमारी अनुश्री गिजे हिने प्रथम केंद्र, बिट, तालुका व जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध चाळणी परिक्षांमध्ये यशस्वी भरारी घेत हा टप्पा पार केला व इस्रो अभ्यासभेटी साठी तिची निवड झाली आहे. आपल्या देशाची अंतराळ संशोधन करणारी संस्था इस्रो याठिकाणी भेट देऊन तिथल्या कार्याची माहिती घेता येणार आहे. या तिच्या गौरवास्पद कामगिरीची दखल घेवून तिचा सन्मान करण्यासाठी व तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहित करण्यासाठी शाळेला भेट देवून गुहागर तालुका मनसे संपर्कअध्यक्ष प्रमोद गांधी यांनी कु.अनुश्री गिजे हीचा सन्मान चिन्ह व रोख रक्कम ५५००/- रुपये देवून सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका विचारे मॅडम, मार्गदर्शक शिक्षक वाघे सर, पदवीधर शिक्षक हळये , गावडे त्याचप्रमाणे तिचे पालक चंद्रकांत गिजे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा अध्यक्ष विनोदजी जानवलकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, शाखाअध्यक्ष सुनील मुकनाक ग्रामपंचायत सदस्य वर्षा शितप त्याचप्रमाणे तालुका मनसे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनी अनुश्री चे मनापासून कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.