वैभववाडीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर संपन्न

Google search engine
Google search engine

एनडीआरएफ जवानांकडून प्रात्यक्षिके सादर

वैभववाडी | प्रतिनिधी
वैभववाडी तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण पार पडले. यावेळी एनडीआरएफच्या टीमने प्रात्यक्षिके सादर करून माहिती दिली. आपत्तीच्या काळात व्यक्तीचा जीव वाचवणे हेच प्रमुख ध्येय असले पाहिजे. घराजवळ पूरस्थिती आल्यास प्रथमता वीज बंद करणे. घरातील सर्व महत्वाची कार्ड सुरक्षित ठेवणे, वयोवृद्धांची अधिक काळजी घेणे, आपत्तीच्या काळात संबंधित आपत्तीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नंबर असणे आवश्यक आहे. घरात पाणी भरल्यास तारेला स्पर्श करू नये, सर्व जनावरांना घराच्या बाहेर सोडणे, मृत जनावरांची विल्हेवाट करणे. त्यामुळे महामारी होणार नाही. अपघातस्थळी प्रत्येकाने जखमीना मदत केली पाहिजे. मदत करणाऱ्यांना प्रशासन कोणताही त्रास देत नाही. मदत करणाऱ्यांना अडचण कधीच येणार नाही. विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर करत माहिती दिली.

यावेळी एनडीआरएफ चे टीम कमांडो धर्मेंद्र सेवड, बिबीशन मोरे, उमेश कुमार सिंह, संतोष जाधव, आदम हराळी, धंदे संदीप, कल्पेश कोकाटे, भगवान नागठणे, योगेश थोरात, रवींद्र पवार, ज्ञानेश्वर गव्हाळे, दत्तात्रय शिंदे, रामदास कोंगे तसेच यावेळी तहसीलदार प्रसन्नजित चव्हाण, महसूल नायब तहसीलदार श्री यमगर, नायब तहसीलदार श्रीमती कासकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नायब तहसीलदार अनंत कवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी सह्याद्री जीव रक्षक टीम करूळचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महसूल विभाग, तलाठी, ग्रामसेवक, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते