आ. नितेश राणेंची संजू शिरोडकर यांच्या ज्वेलर्स शॉपला भेट

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष संजू शिरोडकर यांच्या उभा बाजार येथील ज्वेलर्स शॉपला भाजपचे युवा नेते तथा कणकवली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी संजू शिरोडकर व कुंटुबियांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रवि मडगावकर, गजानन गावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश धुरी, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी जि.प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, दीपाली भालेकर, सुवर्णकार राजू पनवेलकर, विराग मडकईकर आदी उपस्थित होते.